STORYMIRROR

Pallavi Patil

Abstract

2  

Pallavi Patil

Abstract

पहिलं प्रेम

पहिलं प्रेम

1 min
13.6K


 

हे प्रेमविरांनो जरा थांबा

ऐका माझी ही प्रेमकहाणी

प्रेमाची व्याख्या ही नव्हती उमगली

तेव्हाच जुळली माझी गाणी ॥

 

मायेच्या त्या उबदार स्पर्शात

माझा पहिला हुंकार फुलला

बिनधास्त मी आईच्या उदरात

 तो जिव्हाळा खरचं भावला ॥

 

वेदनेतही अनुभूती अलोट सुखाची

ही प्रित अशी जगावेगळी

प्रेमास नसे या उपमा कशाची

आईच्या प्रीतीची भाषाच निराळी ॥

 

माझ्या बोबड्या बोलांत, लुटुपुटु धावण्यांत 

निरागस हास्यांत अन् भोळ्या प्रश्नांत

वात्सल्यांनी ओथंबलेल्या तिच्या भावनांत

सगळे भाव अनुभवले मी तिच्याच डोळ्यांत ॥

 

विनाअपेक्षांच हे प्रेमळ नातं

आयुष्यभर फुलून राहतं

खरं आहे हो तुमचं म्हणणं

पहिलं प्रेम अखेरपर्यंत टिकतं॥

 

हो हो ती आई माझी आई

कशी व्हावी तिच्या ऋणातून उतराई

नाळेला नाळ जोडून स्पंदनाना ही भिडली

आईची प्रीत अशी श्वासांतूनही पुरुन उरली ॥

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract