STORYMIRROR

Pallavi Patil

Others

3  

Pallavi Patil

Others

आज महाराष्ट्र बंद आहे

आज महाराष्ट्र बंद आहे

1 min
27.6K


 

खूप सोसले आता

पुरी झाली मनमानी

उतरला आज रस्त्यावर

आहे खरा स्वाभिमानी

*जगाच्या पोशिंद्याची ही लढाई*

*खरोखरीच जंग आहे*

*हो ..आज महाराष्ट्र बंद आहे*

 

अनेक पाहिले मोर्चे

अन् अनुभवली आंदोलने

शेतकऱ्यांच्या मोर्चा ने

हळहळली हरेक मने

*किसान क्रांती मोर्चात*

*सर्वच जण आता धुंद आहे*

*हो ..आज महाराष्ट्र बंद आहे*

 

 उद्रेक झाला भावनांचा

 रस्त्यावर आला भाजीपाला

कळतेय नासाडी अन्नाची

पण हाच एक उपाय उरला

*सरकारचा निषेध आज*

*सगळीकडे तंग आहे*

*हो ..आज महाराष्ट्र बंद आहे*

 

तुमचा खेळ होतो पण ..

आमचा जीव जातो

कित्येक वर्षे कळकळून

बळीराजा आहे सांगतो

*महाराष्ट्रभर घुमला आज*

*शेतकऱ्यांचा आवाज बुलंद आहे*

*हो ..आज महाराष्ट्र बंद आहे*

 


Rate this content
Log in