पहिली भेट
पहिली भेट


भेट ना पुन्हा त्याच ठिकाणी
जिथे जुळली आपली कहाणी...
त्या ओळखीच्या रस्त्यावरची ती अनोळखी भेट
दोघांच्या नजरा एकमेकांच्या शोधात
दिसताच क्षणी कोणीही प्रेमात पडेल असा तू...
जेव्हा तुझ्या आणि माझ्या भेटीची साक्ष देण्यास लावली वरुणराजाने हजेरी...
अवेळी असं पावसाचं येणं आणि आपली भेट होणं
जणू पिक्चरचाच सीन...
चिंब भिजलेला तू
आणि चिंब भिजलेली मी...
विचार केला जावे एका छत्रीत
पकडावा तुझा हात
आणि एकाच कपात घ्यावी चहाची सूर्की
पण...
सारे काही अवतीभवतीच
भिजलेलं अंग, हळुवार अंगावर शहारा
आणणारी ती वाऱ्याची झुळूक आणि
निःशब्द झालेले ओठ
रस्ता संपला पाऊसही थांबला
एका क्षणी वाटले थांबावा हा क्षण इथेच
आणि ठेवावे तिजोरीत बंद करून
लावावी याच्यावर फक्त only मी ची privacy