बाबा
बाबा
तुम्ही आमच्यासाठी कधी आजोबा नव्हताच
कारण इतरांसारखे तुमच्या हातात काठी आणि डोळ्याला भिंगाचा चष्मा नव्हताच
विश्वास बसत नाही तुम्ही आमच्यात नसल्याचा
सतत भास होतोय तुम्ही सोबत असल्याचा
गावाला तुमच्यासोबत असताना सारखे बोलायचे
खूप खायचं मोठं व्ह्याच आणि स्टील ची body बनवायची
तो नेहमी ठरलेला कुल्फिवाला आपल्याकडे येऊन घंटी वाजवायचा
त्याला माहित आहे वायल्या बाबा पोरांसाठी घेतल्याशिवाय माघारी नाही पाठवायचा
p>
अजूनही ते क्षण डोळ्यासमोर तरंगतात
त्या काळ्याकुट्ट आकाशात जेव्हा चांदणे हजेरी लावयचे
तिथेच तुमच्यासोबत आम्हा नातवंडांचे ही गप्पागोष्टी ची मैफिल सजयाची
हे असे खूप सारे किस्से तुम्ही आमच्या आठवणीत ठेऊन गेलात
मग ते 1 रुपयांसाठी तुमच्या त्या पांढऱ्या केसमध्ये काळे केस शोधणे असो की
बैलगाडीतून जत्रेला जाणे असो
बाबा बघाना काही सेटिंग होतेय का बाप्पा जवळ
आणि या ना आमच्यासाठी , सगळ्या नातवंडांसाठी