STORYMIRROR

Rupali Murkar

Romance

3  

Rupali Murkar

Romance

माझ्या मना

माझ्या मना

1 min
384

प्रेमाची व्याख्या माझ्या आवाक्याबाहेरची,

 पण त्या निरर्थक व्याखेला तू अर्थ दिलास..


रोज तुलाच पाहण्यास जीव आतुर असतो,

अल्लड मनात चालेल्या त्या गमती जमती

त्यात फक्त तू आणि तूच असतोस..


मलाही माहित नाही कधी झाले मी तुझी

स्वप्नाच्या पावसात फक्त तू आणि मी..


तुझ्या हसण्यात सारा आसमंत सामावतो,

तुला हसताना पाहताच रडवेला चेहरा फुलतो..


आता तर तुझ व्यसन एवढ वाढलं की,

तुझ्याविना एक क्षण पुढे सरकत नाही,

सतत तू मला जवळ हवा असतोस..


तुझा सहवास ,तुझे वागणे 

आत्ता मला आपलेसे वाटू लागले,

आता तुझा तो दुरावा सहन होत नाही..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance