फक्त तुझ्यासाठी...
फक्त तुझ्यासाठी...
दोन क्षण पुरेसे होते,
तुझ्या प्रेमात पडण्यासाठी,
तुझाच हात धरायचा ठरवला,
होता आयुष्यभरासाठी...
पाहिले होते स्वप्न फक्त,
आपल्या दोघां साठी,
खूप छोटंस जग बनवलय,
होत रे फक्त तुझ्यासाठी...
आपल्या प्रेमाची जपणूक,
करत होते फक्त तुझ्यासाठी,
पण तूच बदललास माझ्यासाठी...
तू बदललास याची मला खंत नाही,
तर खंत फक्त एवढीच वाटते
की तुझ प्रेम बदललं माझ्यासाठी...
तुझा अबोला,ते चिडचिड करणं
याची Adjustment करते,
फक्त तुझ्यासाठी...
कारण तूच हवास मला,
सोबती म्हणून आयुष्यभरासाठी....