पहिला पाऊस आणि तू…
पहिला पाऊस आणि तू…
पहिल्या पावसात बर्फाच्या गारा पडतात,
त्या गारा जशा मातीत विरघळतात ना,
तसंच माझ्यामध्ये विरघळणारी तू…
स्वच्छंद आकाशामध्ये उडणाऱ्या
कोकीळेची कुहू कुहू, आणि त्या प्रमाणे गोड अशी हाक मारणारी तू….
दरवळणाऱ्या मातीचा सुगंध,
त्या सुगंधासारखं माझं आयुष्य सुखकर करणारी तू….
अंगावर पडणाऱ्या थेंबातून तुझा स्पर्श जाणवून देणारी तू….
पहिला पाऊस जसा मातीमधल्या बियांना रुजण्यासाठी उत्कर्षित करतो,
तसेच माझ्यामधला आत्मविश्वास जागवून प्रेरणा देणारी तू….
पहिल्या पावसाची सर जशी,
तशीच माझ्या आयुष्यात येणारी तू…
रिमझिम पावसाची,
तसंच माझ्यावर प्रेम बरसावणारी तू….
खूपच राग आला तर त्या विजे प्रमाणे माझ्यावर कडाडणारी तू….
दुःखाचं वादळ संपवून, सुखाचा गारवा आणणारी तू….
पहिला पाऊस आणि तू….

