पहाट समयी
पहाट समयी
पहाट प्रहरी मिळतो संदेश
सूर्यनारायणाचा बघा आवेश...
चिवचिवती लहान जीव
जाग्रुत व्हा रे सर्व सजीव....
किरणांना या सामावू ओंजळीत
ऊर्जा सागर जणू अविरत..
पुष्प कोमल उमलून बघती
मनमोहक ही फुलपाखरे दिसती..
ओले दवं चमकून जाते
सृष्टीशी त्याचे प्रेमळ नाते..।
