बुद्ध
बुद्ध
भगवान बुद्ध
कारूण्यमूर्ती
घेता बोध त्यांचा
होई आयुष्यपूर्ती......
बोधीवृक्ष बनला
ज्ञानाचा सागर
महात्मा गौतमास
प्रणिपाती चराचर....
जीवनमृत्यूचा
उलगडला डाव,
मनुष्यमन करे
मनावरच घाव....
अखंडच आहे
इथे दुःख जरी,
आर्यसत्ये तयांचा
सदा नाश करी....
सोडून मोह माया
सत्य जो शोधतो
अष्टांग मार्ग
त्यालाच कळतो.....
