रंग
रंग
1 min
159
आयुष्य रंगीबेरंगी करणारे
अनेक रंग,
पाहून मन हरपावे
अशी नितळता रंगात..
नावंही दिलेत आपण प्रत्येकाला
आणि प्रतिक सुद्धा आपणच ठरवले..
हिरवा सुख -सम्रुद्धीचा,
पांढरा त्यागाचा,
लाल शौर्याचा,
निळा शांततेचा,
अन् बरेच काही....
या सगळ्यांनी मिळून
बनलेल्या इंद्रधनू सारखेच
आयुष्यही रंगीतच!
कुठल्याही एका रंगाला
वेगळे करताच येणार नाही,
आयुष्यातून....
केवळ सुख नाही तर
केवळ दु:खही नाही..
म्हणूनच तर मजा असते
हे रंगीबेरंगी आयुष्य जगण्याची!
