राष्ट्रसंत तुकडोजी
राष्ट्रसंत तुकडोजी
घेऊन खंजेरी हाती
केली विनवणी त्यांनी,
माणूस द्या मज माणूस
इच्छा हीच होती मनी...
भजन कीर्तनातून अपुल्या
जागवले राष्ट्रप्रेम,
इंग्रजांच्या जुलुमांवर
धरला अचूक नेम....
जनसेवा हीच ईश्वर सेवा
दिला संदेश ग्रामगीतेतून,
ग्रामजीवनाचे तत्व
त्यात वर्णिले मनातून....
ग्राम असे देशाचा पाया
मजबूत सर्वांनी करा,
उन्नत राष्ट्र करण्यासाठी
ग्रामगीतेचा मार्ग धरा....
