STORYMIRROR

Mangesh Medhi

Tragedy

4  

Mangesh Medhi

Tragedy

फाशी

फाशी

1 min
352

आर भल्या मानसा

मले कायले कोसतो

तुझ्या कर्माची फळ

तुच आज भोगतो

वन, रान कापली

झाड नाय लावली

पहाव तवर निसत

उघड, बोडक माळ

कचा कचा कापून

सिमटीची बांधली

कदर न तुले, रानाची

न वनाची, न मातीची

चटक निसती, पैशाची

जमिनी ईकाची

देव भूमी, माझी

कोकणी राणी

बघ तेनी, राखली

वनी देवराई

काडी, काडी जमून

जगते ते शेतकरी

जाणते ते मोल

पाण्याचे, झाडाचे, निसर्गाचे

जपते त्याले लेकरा वानी

दुष्काळ त्याला बी

संकट त्याला बी

पर लढते ते

ना रडते, ना हरते

ना ईष पिवून मरते

धीरान भागवते

म्हणून मला बी

तिथच राहू वाटते

तू बी लढ

एक तरी माळ

हिरवा फुलव

येईन मी तीथ बी

राह्यला , वस्तीला

दोघ बी, खावू की

म रान मेवा

अन म ठरवू

फाशी देऊ कुना

मला, तुला ?

का

निराशेला, दुष्काळाला ?

आळसाला, लाचारीला ?

का भीतीला ?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy