फाळणी
फाळणी
भावनांची कापणी आहे
वेदनांची पेरणी आहे
ओठ ओठांशी मिळाल्यावर
फाळणीची मागणी आहे
ढोल ताशे वाजले मोठे
साजणीशी फाळणी आहे
चाळतांना भूतकाळाला
आसवांची नोंदणी आहे
हासतांना ओठ थरथरले
चिंब ओली पापणी आहे
ऐरणीला घाव सोसेना
जीवनाची चाचणी आहे
काढले मी चित्र दैवाचे
वादळांची मांडणी आहे
