STORYMIRROR

Sanjana Kamat

Inspirational

3  

Sanjana Kamat

Inspirational

पेरणी

पेरणी

1 min
277

कलयुगात कशी विसरली माणुसकी,

रक्ताची नाती ही जीवावर उठलेली.

मळभ सरू दे मृगनक्षत्रांच्या सरीने,

महामारीची काळी दिशा अंधारलेली.


करे,भूमातेची सेवा सर्जाच्या जोडीने,

कास्तकार फेडे मातीचे ऋणानुबंध.

नागंरणी, लावणी, पेरणी, खुरपणी,

प्रामाणिक कष्ट कस्तुरीचा मृदगंध.


समता,बंधुभाव, विचारांची मशागत,

प्रेम,जिव्हाळा नांगरणी स्पंदन हृदयाचे.

बीज अनमोल सुसंस्कारित पेरणीचे,

अंकुर फुटतील सत्कर्माच्या लावणीचे.


देशहिता सत्य कायद्याची खुपरणी,

विसरू रासायनिक खतांची फवारणी.

सौंदर्य सृष्टीचे सत्ययुगाचे परिवर्तन,

सद्विवेकबुद्धीचे शिवार प्रत्येक अंगणी.


सुकाळ दुष्काळ परिक्षा ही मानवाची,

लाख घाव सोसून कोहीनूर चमकतो.

शांत, मृद्गंध सृजनाचे बीज पेरणीत,

दृढनिश्चियी, सुसंकल्पी देह सजवितो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational