पावसासवे
पावसासवे


उतरती पावसासवे
तुझ्या आठवणींचे थवे ।।
उडविती तुषारांना अंगावरती
तुझे ते खट्याळ हात हवे ।।
चिंब भिजलेली गोरी ओली
जशी नितळ कमळ तळ्यातली
वादळात सोसाट्याच्या सावरली वेली
गारव्यातही या ओल्या स्पर्श मज हवे
उतरती पावसासवे
तुझ्या आठवणींचे थवे ।।
हा ताजमहाल यमुनातीरी नित्य खुणावितो
अबोल ओठी गीत तुज गुणगुणवितो
चिंब भिजविण्या हाच वर्षावितो
मज पुन्हा वाटते 'ते' तेच गीत गावे
उतरती पावसासवे
तुझ्या आठवणींचे थवे ।।