STORYMIRROR

उमेश तोडकर

Tragedy

3  

उमेश तोडकर

Tragedy

पावसा

पावसा

1 min
222

रुसलास का आमच्यावरती

असा कसा आज तू

पंधरावडा उलटला तरी

आला नाहीस अजून तू

पिकं दुपार धरू लागली

भेगा पडल्या जमिनीला

ऊन त्रस्त करू लागलं

जमिनीवरच्या पिकाला

येवू नको कोरड्या आभाळा

भरून ये आज तू

भिजवून टाक जमिनीला

तरारी येवू दे पिकाला

तुझ्या थेंबा थेंबा साठी

आसूसला रानमाळ सारा

काढ रुसवा ये आभाळ भरून

भिजवून टाक निसर्गाला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy