STORYMIRROR

Amit Kawade

Inspirational

3  

Amit Kawade

Inspirational

पाऊस

पाऊस

1 min
135

गेला आषाढ, आला श्रावण,

झाडे झूडपे झाली पावन,

कोकीळ गाये मंजुळ गाणी,

जिकडे तिकडे पाणीच पाणी


पाऊस मज आवडे खूप,

पाण्याचे ते शुद्ध स्वरूप,

बघा किती दिसतो छान,

जसे बरसती इंद्राचे बाण


तुटक तुटक तिरप्या रेषा,

नेई मज इंद्रधनुच्या देशा,

गोल टिपूस चंदेरी मोती,

कुबेरासम भासे ख्याती


संगे घेऊन दवबिंदूना,

साकडे घालुन किरणांना,

सप्तरंगी आणतो रंग,

दिसे अर्धाकृती वर्तुळखंड


सृष्टीला ही तोच जागवी

क्षणात तृष्णा तोच भागवी

फवारून साऱ्या धरतीला

ओढ भरतीची सागराला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational