STORYMIRROR

Amit Kawade

Thriller

2  

Amit Kawade

Thriller

धरणीकंप

धरणीकंप

1 min
87

भुगर्भाच्या कंपामधुनी,

सागर उसळी लाटा,

मोडून संसाराच्या पंगती,

दूर पांगल्या वाटा,


आक्रोश आणि किंकाळ्यांनी,

सैरभैर झाला बोभाटा,

काय करावे कुणा सुचेना,

रुते काळजात काटा


नियतीचा हा खेळ कसला,

जीव पाण्याच्या कवेत भिजला,

निर्लज्ज्य होऊन वेड्यासारखा,

वादळवारा बेभान सुटला


वाहून गेली गुरे वासरे,

दूर उडाली पिले पाखरे,

रोखलेला श्वास गुदमरे,

जीवे मुकली निष्पाप लेकर


पाण्याला ही चढली नशा,

भिजून गेल्या दाही दिशा,

शर्यद स्वप्नांची गेली मोडून,

खापर नशिबावर फोडून


साद घालू कुणा कळेना,

मदतीचा ना हात मिळेना,

सर्वच गेले पाण्याखाली,

मागे ना उरला कोणी वाली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller