STORYMIRROR

Amit Kawade

Thriller

3  

Amit Kawade

Thriller

नदी आणि नाव

नदी आणि नाव

1 min
219

नदी आणि नाव

ह्या दोघींचं एकच गाव,

जसं दवं आणि गवताचं पातं,

तसं ह्या दोघींचं नातं


आज हे नातं तुटलं होतं,

कारणचं तसं काही घडलं होतं.


नेहमी हेलकावणारी नाव,

आज मात्र गप्प होती,

म्हणूनच जणू आज ती

खडकालगत थप्प होती


नेहमी भिजणारा वल्हा,

आज मात्र सुकाच होता,

म्हणूनच जणु आज तो,

नावेत आडवा पडला होता


नक्की काय घडलं,

कुणालाच काही कळत नव्हतं,

दूर नदीपलीकडे,

काहीतरी जळत होतं


तिथूनच येणारा धूर,

हळुच आसवे गाळात होता,

जणु त्या नावेचा,

नावाडी तिथे जळत होता



Rate this content
Log in

Similar marathi poem from Thriller