पाऊस
पाऊस
पाऊस एकदाच कोसळून गेला
जळत्या हृदयावर माझ्या
पाणी शिंपडून गेला...
हृदयातील आगीचा
निखारा झाला
त्यावर तिने प्रेमाने
फुंकर घातल्याने
वणवा पेटला...
त्या वणव्यात पेटले सारे
तन आणि मन माझे
वाट पाहतोय आता कोणी तरी म्हणण्याची आला रे आला !
पाऊस आला...

