STORYMIRROR

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

3  

PANKAJKUMAR THOMBARE

Romance Tragedy

पाऊस

पाऊस

1 min
165

आपसात भांडणास सोडवून घे 

आपल्याच माणसास ओळखून घे 


काळजात आटला कसा तुझ्या झरा

हृदयात पावसास शिंपडून घे 


आसवात खेळतात स्वप्न कोवळे 

स्वप्न आज तू उन्हात वाळवून घे 


वास्तवात विस्तावात पेटली मने

पावसास आसवात साठवून घे 


साजणी मला तुझ्या मिठीत घे जरा

पावसात प्रेमपाश आवळून घे 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance