पाऊस ओला...
पाऊस ओला...
एक मंतरलेली रात्र
त्यात तुझ्या आठवणी ओल्या...
पावसाळी कुंद वातावरण
अन् रिमझिम सरी आल्या.....
मनात एकच आस
तू यावंस, आत्ता याक्षणी
चिंब चिंब होऊन
गुणगुणत पाऊस गाणी....
ओल्या देहाकडे पहात तुझ्या
क्षणभर मी ही हरवून जाईल...
तुझ्या-माझ्या पाऊस आठवणीत
जरा वेळ गढून जाईल...
तुझ्या देहावरून ओघळणारे थेंब पहात
मी फक्त थांबणार नाही....
तुझ्या ओठांवरून ओघळणाऱ्या थेंबांना
टिपण्याचा मोह मला आवरणार नाही...
मग तुही मला बाहुपाशात घेऊन
हळूहळू विरघळवशील
कोरड्या असलेल्या मला,
तुझ्या प्रेम सरीत चिंब भिजवशील....
