Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

sayali Kasture

Others

3  

sayali Kasture

Others

वळण

वळण

1 min
12.1K


आयुष्यात एखाद्या वळणावर.....


आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात....... जसं पुस्तकात जपलेलं पिंपळपान...            पुन्हा पुन्हा उघडून पाहण्याचा मोह होत असतो पण... 

धक्का लागू नये म्हणून जीव पण तुटत असतो.


आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात..... 

जसा कुपीतल्या अत्तराचा फाया..

 क्षणोक्षणी मनात गंध दरवळत असतो पण..

 पुन्हा पुन्हा गंध जोखण्याचा मोह मात्र अवरत नसतो.

 

 आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात...

 जसा अचानक किनाऱ्यावर सापडलेला मोती ...

खरंच मोती आहे यावर विश्वासही बसत नसतो, तरीपण ...

आपल्याच नशिबाचा आपल्याला हेवा वाटत असतो.


आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात..….. जशी थंडगार हवेची एक झुळूक.. सतत हवी असण्याचा मोह होत असतो पण...

 कायम सोबत ठेवण्याचा अट्टहास मात्र नसतो.


आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात....

 जसा ग्रीष्मात फुललेला गुलमोहर...

ऊन अंगाची काहिली करत असतो पण....

 फुललेला गुलमोहर मात्र डोळ्यांचं पारणं फेडत असतो.


आयुष्यात एखाद्या वळणावर अशीही माणसं भेटतात......       


Rate this content
Log in