पाऊस गेला अभायात
पाऊस गेला अभायात
ओलं पुरी होता
व्हावे शेत पेरता
घाई फार शेतकरी
जेवा जेवा करता
पेरून ही बसता
अभायाकडे पाहत
विचारता पाऊस
कुठे भाऊ गेलात
काय सांगावे
घाई करता त्यांना
दरवर्षी पुढे अन
पुढे निघून जाताना
माझं बी खत
सरी सरी वर
निघून येते साधते
विचार पेरण बरं
काय सांगावे त्यांना
महागाचे बि खत
धरणीमाता एक फुट
ओल एवढेच सत
