STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract Tragedy

पाऊस आलाय…

पाऊस आलाय…

1 min
288

पाऊस आलाय….भिजून घ्या


थोडा मातीचा गंध घ्या थोडा मोराचा छंद घ्या


उरात भरून आनंद घ्या...


आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा समुद्र उसळतोय वारा ढगांना घुसळतोय


तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..


आलाय पाऊस…..भिजून घ्या


ऑफिस रोजच गाठत असतं काम नेहमीच


साठत असतं मनातून भिजावंसं वाटत असतं


मनाची हौस पुरवून घ्या.


आलाय पाऊस…..भिजून घ्या


सर्दी पडसे रोजचेच.. त्याला औषध तेच तेच..


प्यायचेच आहेत नंतर काढे , आधी अमृत


पिऊन घ्या...


आलाय पाऊस…..भिजून घ्या


बघा निसर्ग बहरला, गारव्याने देहही


शहारलंय मनही थोडं मोहरून घ्या..


आलाय पाऊस…..भिजून घ्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract