STORYMIRROR

Umesh Dhaske

Abstract

3  

Umesh Dhaske

Abstract

पाठम्होरा...!

पाठम्होरा...!

1 min
231

उभ्या आयुष्याचा उंबरा

आज पाठम्होरा झाला

वळून पाहिले ना त्यानं

चेहरा झाकूनी घेतला....!


अनवाणी पाय आता

हतबल होऊनी गेले

आधाराची काठी शोधताना

दिवस वार्‍यानं उडूनी नेले...!


कुंकू लाखमोलाचं गं माझं

आजाराच्या बाजारात

जणू समईच्या ठायी मी

कापसाची वात....!


पिकल्या देहानं गं आता

जीव लढाया लाविला

रक्ताच्या नात्यांच्या राखेचा

टिळा भाळी मी लाविला...!


संग सोबत अशीच 

जन्मभराची मिळू दे

तुमच्या पायी धनी माझा

उभा जन्मचं जळू दे....!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract