ऑक्सिजन
ऑक्सिजन
कोरोनाने जगाची झोप उडवली
भीतीने माणसाची प्राणज्योत मावळली
प्रेतांच्या त्या रांगाच रांगा पाहून
स्मशानभूमी ही सुद्धा गहिवरली.. 1
ऑक्सिजनच्या अभावी
शोककळा ही पसरली
जगात झाला सन्नाटा
प्रेत अग्नीत लीन झाली.. 2
असा कसा हा कोरोना
मानवाचा घेत आहे बळी
धास्तावले जग हे सारे
प्रश्न आहेत मात्र अधांतरी.. 3
