STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy Inspirational

3  

Shobha Wagle

Tragedy Inspirational

ओझे अपेक्षांचे घेऊन पाठीवर

ओझे अपेक्षांचे घेऊन पाठीवर

1 min
92


ओझे अपेक्षांचे घेऊन पाठीवर

लहानपणा पासून सतत वावरत आहे

आईबाबांच्या इच्छे खातीर करत आले

आज नाही कोणीच माझ्याकडे पाहे.


संसाराचे चाक ओढते नाही पर्वा कुणा

त्यात मोठे काय बरे म्हणायचे असते

'जावे त्यांच्या वंशा' मनात समजून

कोणालाच काही बोलायचे नसते.


सगळ्याच सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करणे

नाकी नऊ येत असतं,तरी करत असतो

एवढं करून सुध्दा मवाळ शब्द मिळणे

नशिबात माझ्या कधीच तो नसतो.


पूरे झाला आयुष्याचा खेळ हा कसरतीचा

श्वास मोकळा मनासारखा घेऊ दे मजला

झिडकारुनी टाकू भार सारा ह्या ओझ्यांचा

स्वतःचा आता विचार करणार सांगते तुजला.


स्त्री जन्मा ही तुझी कहाणी तूच केली

पूरे कर आता सारे, फक्त जग तू आता

तुझ्याच सुखाची ओझी घे तू आता पाठी

लक्षात ठेव तू ही आहे जगी एक माता.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy