नव्यायुगाच्या युवकांनो
नव्यायुगाच्या युवकांनो
यशवंत हो पणऽऽ विलासी होऊ नको,
अरे अरे माणसा अधाशी होऊ नको
कणखर देशातील माणसा रक्षक हो,
जनतेला लबाडून भक्षक होऊ नको
वादळाला थोपवणारे तुझे बाहू,
वाईट करून भ्रष्ट होऊ नको
सदाचारी राहून श्रीराम जरू रहो,
पण जनतेची परीक्षा घेऊ नको
पांडवा सारखे बलवान चतुर हो,
पण जनतचे हक्क धुतावर लावू नको
हे माणसा समृद्धी, समता नांदण्यासाठी,
बुद्ध महावीराच्या शिकवणीचा शांतीदूत हो
शिवराया सारखे थोर रयतेचा राजा हो,
ज्योतीरावाचा वसा घेऊन गरीबाचा वाली हो
शाहूमहाराजा सारखा जनता पालक हो,
अनऽ डॉ. बाबासाहेबाच्या लेखणीचा वसा घेऊन
समतेचा क्रांतीदूत हो
कोणत्याही जातीचा, धमााचा, पंथाचा असो, पण कलंकीत होऊ नको
खाच खळग्यातुन वाट काढत, नव्या युगाचा शिल्पकार हो
यशवंत हो पणऽऽ विलासी होऊ नको,
अरे अरे माणसा अधाशी होऊ नको
