नव्या आशा
नव्या आशा
नव्या आशा नव्या दिशा
आली घेवून पहाट
नव्या उमेदीने मांडू
नवं स्वप्नपूर्ती थाट ||१||
आनंदाने बहरण्या
जगण्या नवी कातर
पाकळ्यांनी उमलून
दरवळावे अत्तर ||२||
नव्या वर्षाचे स्वागत
वारे आनंदी वहाते
गीत जीवनाचे गावे
पुन्हा सुरळीत व्हावे ||३||
मनी करून संकल्प
राहू जिद्दीने लढत
वसा सत्कर्माचा घेत
धर्म मानव जपत ||४||
द्वेष सारे दूर सारु
सत्य चाकोरीत धरु
शुभ आरंभ कार्याचा
मांगल्य स्विकार करु ||५||
