STORYMIRROR

Dipaali Pralhad

Inspirational

4  

Dipaali Pralhad

Inspirational

नको पुसु मज मी कोण ती ?

नको पुसु मज मी कोण ती ?

1 min
323

नको पुसु मज मी कोण ती ?

काळोख्या रातीच्या चंद्राची 

महती देणारी पौर्णिमा मी 

टपोर चांदणं साथीला मन अधीर 

भावणारी आमावस्या मी 


नको पुसु मज मी कोण ती ? 

नक्षत्रांचं सुंदर लेणं मी 

प्रेमाच्या अस्मितेची जाणीव मी 


नको पुसु मज मी कोण ती ?   

मी प्रेममूरत जिजाऊ मी आदिशक्ती 

सुंदरता कामिनी ,निडर शेरनी मी 


नको पुसु मज मी कोण ती ?  

आकाशीची लखलखती वीज मी 

गर्जुन बरसणारी श्रावणधारा मी 


नको पुसु मज मी कोण ती ? 

मीच पत्नी मीच प्रेयसी 

ग्रीष्मात मंद झुळुक गारव्याची 

उबदार माया हेमंता मधली 


नको पुसु मज मी कोण ती ?   

शब्द मी , सूर मी , स्पर्श मी 

मीच बुद्धी मीच आदि अनंत मी 


नको पुसु मज मी कोण ती ?     

संगीत मी , मीच कविता 

आकाशीचे सप्तरंग मी 

मीच कीर्ती अजिंक्य मी 


नको पुसु मज मी कोण ती ?      

हे विश्व मी अन माझ्यात विश्व  

ना जीव कुठला मजवाचुन 

ना कुठली नीव माजवाचुन 

आदी मी अनंत मी 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational