Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sarika Jinturkar

Inspirational

3.4  

Sarika Jinturkar

Inspirational

निसर्गाचा नजराणा

निसर्गाचा नजराणा

1 min
259


 🌿☘🌺🌸

पहाट होताच हिरवा साज ओढून

बघता, सृष्टीचे रूप वाटे स्वर्गानुरुप 

अन् डोंगराच्या माथी सूर्य प्रकाश 

शुभ्र धुक्यांची नभात रास जणू  


प्रसन्नता, समाधान देई

सुगंधी फुले ही, मन प्रफुल्लीत सुहास 

गवताच्या पात्यावरून हवेचा हा प्रवास  


निरभ्र आकाश अन् रवी किरणांनी उगवलेली सोनेरी ही पहाट.....

 पहाटेचा निसर्ग असा सुंदर देखना  

कोवळी पहाट समोर ,नयनी टिपावा कधीतरी निसर्गाचा हा सुंदर रम्य नजराणा


 पसरलेले हे दूरवर डोंगर,

 विशाल त्याची काया 

निळे, सावळे आकाश देई 

धरतीला जणू शीतल छाया  


गार गार वारा,गुलाबी थंडी सह

 पानापानांवर दवबिंदूचा थाट

 सौंदर्याचे माणिक-मोती 

सजले हिरव्या रंगात

सुंदर कोमल फुले ही मग

 वारयासह डोलतात


 निसर्गाची किमया भारी....

 जशी डोळेभरून पहावी ...

त्याच्याच रंग संगती मध्ये मंद झुळूक

 वाटे मज हळूच स्पर्शुन जावी


कंठी येती गाणी कुठली पाखरां 

सह भान हरपे

 निसर्ग सारा गातो गाणे रोमांचित 

हे मन मग होते  

 विलोभनीय दृश्य हरित पर्णानी वेढलेले झुबकेदार पुष्प

 

 वृक्ष, पानवेली, पाखरे अन फुलं

 उधळती तर्‍हेतर्‍हेचे रंग 

रंग चोरूनी आभाळाचे

 सजली वेडी रानफुले

 मृदू गंधाच्या अत्तरतूनी सर्वत्र 

पसरलेला सुगंध  


अपरिमीत देई आनंद नकळत मना

 भरभरून बघावा, मनसोक्त आनंद घ्यावा

किती सुंदर हा निसर्गाचा नजराना 

 

वाटे मनास वर्णू किती ईश्वरा

 या निसर्गाची महती 

शब्द नाहीत माझ्याकडे सांगण्यास किर्ती  


म्हणुनच कधीतरी या अद्भुत सुंदर निसर्गाच्या कणाकणात बेधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळेवेगळे

 प्रत्येक श्वासात भरून घ्यावे 

 उगवत्या सूर्याच्या प्रकाशात 

जीवन आपले उजळावे 

चंद्र चांदण्याच्या सोबतीने

 कलेकलेने आयुष्य जगावे  


या निर्मात्याच्या अविष्काराचे प्राणपणाने 

सर्वांनी जतन करावे 

निसर्ग देतो आपणास भरभरून

 त्याचे ऋण अंतपर्यंत ना विसरावे ....🙏🌿🍃🌺🌸☘🍃🌿


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational