निरोप गत सालाला
निरोप गत सालाला
खर पाहता गत साल
कोरोनाच्या छायेत गेलं
बघता बघता कैक जीवांना
कवेत आपल्या घेऊन गेलं
घर, गाव काय असत
सारं काही सांगून गेलं
कुटुंबाला एकत्र बघून
वेळ द्यायला शिकवून गेलं
धावण्याची गती खुंटवून
थांबण थोड दाखवून गेलं
टाळे बंदी करून साऱ्यांना
स्वतः त डोकावून बघायला शिकवलं
नियम बंधन तोडण किती
महागात पडत शिकवून गेलं
पोलिसांच्या लाठीचा ही
प्रसाद नको तेवढा देऊन गेलं
जाता जाता कोरोनाला
सोबत आत्ता घेऊन गेलं
एवढं सुद्धा वाईट नव्हत
नवं खूप शिकवून गेलं
एका माग एक नवी जुनी
सालं वर्ष जात राहतील
मागच्या कडून अनुभव घेऊन
नवं सालाच स्वागत करू .....
