आयुष्य..
आयुष्य..
आयुष्यातील तुफानाशी
रोज नव्याने लढतो आहे
जिद्द चिकाटी परिश्रमाने
सुख थोड जोडतो आहे
देवळातल्या दगडावरती
नारळ रोज फुटतो आहे
माणसातल्या देवामधला
ईश्वर रोज शोधतो आहे
अपमानाचा काटा अजून
खोल मनात सलतो आहे.
चिंता क्लेश दारिद्रयावर
तुटून आज पडतो आहे
येता पाऊस जाता ऊन
घरटे पुन्हा झाकतो आहे
जगणे मरणे मधले अंतर
तोलून पुन्हा बघतो आहे.
