निंदा नालस्ती
निंदा नालस्ती
आपला प्रभाव वाढल्याची, खूण असते निंदा घडणं,
टीका,निंदा असते विकृती, करा अश्या निंदेला टाळणं...
ज्याच्या वाटेला नाही निंदा,असा माणूस नाही सापडणार,
कौतूक करणं जितकं स्वाभाविक,तितकीच निंदाही होणार
निंदेला देऊ नये उत्तर,ना कशाची करू नये शहानिशा,
कार्यविश्वात राहा कार्यरत, स्थिरचित्ताची धरावी आशा...
ध्येयवाटेवर येणार निंदेचे खड्डे, त्याच्याजवळ नका रेंगाळू,
उडी मारून पुढे चालतच राहा, यशाकडेच आपण वळू...
