STORYMIRROR

Shrikant Kumbhar

Abstract

2  

Shrikant Kumbhar

Abstract

निखारा

निखारा

1 min
402

मी निखाऱ्याला शांत समजून,

लालबुंद प्रकाश पाहत होतो

त्या प्रकाशाच्या आर्त मनात

काय होतं कुणास ठाऊक,

पण त्या धगधगत्या निखाऱ्याने 

केली मनाची ठाव


अशावेळी काय करावे,

त्या लालसर ज्योतीने...?

मारली झडप अन् न करावं ते झालं...

मी समजलं होतं की,

निखारा दिसायला शांत, पण...

पण त्या निखाऱ्यातील ऊर्मीच आहे भन्नाट,

शांत चित्ताने कधी चितेला पेटवतो...

तर कधी मनाला,

या सर्वांच्या जगण्यास, निखाऱ्याची साथ आहे...


निखाऱ्याला समजावे तरी काय?

तर...

निखारा म्हणजे...

शांत चित्ताचे मन,

शांत चित्ताच्या मनाला पेटलेले तन,

पेटलेल्या मनाची वादळे

आणि... आणि...

संथ वाहणाऱ्या वादळाची गुणगुण...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract