STORYMIRROR

Shobha Wagle

Tragedy Action Inspirational

3  

Shobha Wagle

Tragedy Action Inspirational

निजले बाबा

निजले बाबा

1 min
127

जातीभेदा नष्ट कराया झटले बाबा

समानतेच्या न्यायासाठी लढले बाबा


अमाप शिक्षण घेऊन बनले महान पंडित

शिक्षण सकला देण्यासाठी झिजले बाबा


घटना कलमे प्रस्थापितली न्याय शिकवला

मताधिकाराला पण कारण ठरले बाबा


स्त्री-जातीला बरोबरीचा दर्जा दिधला

लोकहिताच्या तत्त्वासाठी जगले बाबा


सहा डिसेंबर श्वास घेतला अखेरचा अन्

चैत्यभुमीला पावन करुनी निजले बाबा.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy