STORYMIRROR

SANJAY SALVI

Romance

3  

SANJAY SALVI

Romance

नि:शब्द शब्दातून...

नि:शब्द शब्दातून...

1 min
288

नि:शब्द शब्दातून भावना या मांडताना,

डोळे मिटून घेतले पण,

शब्द काही आठवेना,


नि:शब्द शब्दातून भावना या मांडताना,

किती स्वतःशी हितगुज केले,

भेट तुझी ठरविताना,

किती स्वतःला वळून पाहिले,

आरश्यात निघताना,


नि:शब्द शब्दातून भावना या मांडताना,

समोर तू समोर मी,

दुजा कोणीही नसताना,

शब्द माझे अडखळले,

अन कंप सुटला ओठांना,


नि:शब्द शब्दातून भावना या मांडताना,

असे कसे हे आजच घडले,

सगळे सुरळीत असताना,

प्रेमात असेच होत असावे,

भावना वक्त करताना,

नि:शब्द शब्दातून भावना या मांडताना!!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance