नातू
नातू
आबा.. तू कसा आलास?
अरे मी हळूच आलो... लपून लपून!
नातू खळखलूंन हसतो
आबाचा चेहरा फुलूंन येतो
आपल्याकडे बाळ कधी आलं रे?
अंधाल पलल्यावल!! मोगली हाय ले
मी बाळ घेऊन जाणार पुण्याला!
बाल आमचय!!! मी नाय देनाल तुला!
मी आबा शेजाली जेवनाल..
आबा.. भात आमती दे..कुरडई दे..दही दे.. दुदु दे मला भाजी नक्को.. पूर्ण ताटात सगळा गोपालकाला!!
तुला सगळे animal दाखवतो..
आणि ते सगळे animal आबाच्या डोक्यावर शम्बो करून त्याने ओतले.
सगळ्या animal,ची ओळख परेड.. टेडी बिअरची poem तालात..मज्जा..आबा सुखात!!
मोबाइल वर कार्टून..
तीन तास झालेत नातवाला भेटून...
आबा.. तू कुठे ल्हातो?
पुण्याला..
पुण्याला fountainअसतं..मी बगितल..पाणी उंच जाते
चल मी निघतो ग...
आबा.. मी पण येणाल तुझ्या बलोबल
स्वारी लगेच सॅंडल घालून तैय्यार
तिघे..आबा, नातू आणि भाचा . एस टी स्टँडवर
ही गाडी कुठे जाती?
सांगली ला..
ही दुसली कुठे?
कोल्हापूर ला!!
ती बघ.. दुसलि आली..ती कुठे जाती?
वडगावला..
आबाचे बोट घट्ट पकडून स्वारी पुण्याला जायच्या आनंदात..
आबाच्या काळजात कालवाकालव..
तेवढ्यात पुण्याची एस टी समोर..
भाच्या ने त्याला उचललं..
मी आबा बरोबल जानाल..तो मोठ्याने रड़तोय
आबा ..आबा..आबा..मी तुझ्या बलोबल...
मागे पहात...
डोळे आणि भरलेल काळीज घेउन आबा एस टी त
आबाचं मन भरून!!!
आबाचा प्रवास सुरु..आनंदाचा ठेवा घेऊन!!!
