STORYMIRROR

ankita kardile

Abstract Inspirational

3  

ankita kardile

Abstract Inspirational

नातं कसं असावं

नातं कसं असावं

1 min
179

नाते असावं कसं

पाऊस आणि मातीसारखं नुसत्या चाहुलेनेही सुगंधाने दरवळावं जसे 

नाते असावे कसे


झाड आणि वाऱ्यासारख

नुसत्या एका प्रेमळ झुळुकींनेही

प्रेमाने आलिंगन द्यावं जसे

नाते असावं कसं 

डोंगर आणि दरीसारखे


एकाकडून चुक झाली तर दुसऱ्याने सावराचे जस 

वरच्या टोकाकडून खाली डोकुन बघावं तर फक्त प्रेमच प्रेम हिरवळीत दिसाव जस


नातं असावं कसे

नदी आणि सागरासारखं

एकाच्या भेटीसाठी दुसऱ्याने

फक्त वाहत जावं जसे


नाते असावे कसे

आभाळ आणि सुर्यासारखे 

एकाच्या रंगात रंगुन दुसऱ्यानेही सुंदर व्हावे जसे


नातं असावे कसे

चंद्र आणि चांदणीसारखें 

रात्रीच्या अंधाऱ्या प्रकाशातही

नेहमी सोबत असारे जस


नातं असावं कसं तर ते असावं हे या निसर्गासारखं

स्वतःसाठी न जगता निःस्वार्थ दुसऱ्यासाठी जगावं जसं ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract