STORYMIRROR

ankita kardile

Classics

3  

ankita kardile

Classics

एका प्रवासातला सहवास...

एका प्रवासातला सहवास...

1 min
196

खुप वर्ष झाली आज विषयात विषय निघाला

आज वर्णन अश्या एका प्रवासाचे ज्याने बदलले जग आजवरचे

खास होता एक प्रसंग असा घडलेल्या त्या प्रवासात 

न विसरता येणारे क्षण असे अतिसुंदर 

अश्या या नयनरम्य प्रवासात भेटला एक व्यक्ती

अचानक बघताच त्याला जणू संपले होते आमच्या मधले अंतर

न कुठली ओळख ना कुठला संबंध

अचानक घडलेला तो सहवास देत होता सुंदर असा गंध 

गंध होता तो एका नव्या भावनेचा, एका आपुलकीचा,

एका नजरानजरेचा, कदाचित एका प्रेमाचा....

आधी कधी कुठल्याच प्रेमात न पडलेल्या व्यक्तीचा

त्या सहवासातून बोलणे सुरू झाले

बोलता बोलता ओळखीत वाढ झाली मग कळले की तो ही सहभागी होता त्याच प्रवासात 

दूर कुठून तरी आलेला शांतता शोधण्यासाठी

पण माझ्या मनात मात्र त्याने वादळ केलं होत निर्माण

चार दिवसाच्या त्या सहवासात त्याने दिला होता माझ्या मनाला आराम

शिकले खूप त्याच्याकडून काही अनुभव, काही गोष्टी, काही संवाद तर काही आभास 

मग काय! प्रवास संपला ओळखही संपली 

शेवट मात्र आमचा त्या रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर झाला

तिथून तो त्याच्या वाटेला आणि मी माझ्या वाटेला

पण आजही मात्र मनात कुठेतरी आठवतो तो प्रवास आणि मला भेटलेला तो सहवास.....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics