STORYMIRROR

ankita kardile

Abstract Romance

3  

ankita kardile

Abstract Romance

हा पाऊसच उरलाय....

हा पाऊसच उरलाय....

2 mins
155

पुन्हा एकदा हा पाऊस आला

आल्यासरशी भूतकाळात घेऊन गेला 

मग आठवणी देखील त्यात नाऊन निघाल्या 

नाही नाही म्हणता एक एक बाहेर पडल्या

जेव्हा आठवली ती पहिली भेट 

असाच पाऊस आणि समोर आली ती थेट 

बघताच भान हरपले माझे 

न म्हणता मग मनात वाजू लागले गाणे 

गाण्यावर त्या ठेका धरावा म्हटलं 

पुढे होऊन जरा ओळख वाढवावी ठरलं

हळूच बिचकत घाबरत नमस्कार मी घातला 

समोरून हळू पण सुंदर हसत प्रतिकार सुद्धा आला

मग "पुढे कुठला थांबा तुमचा?" हा प्रश्न मी केला योगायोगाने तो देखील दोघांचा एकच निघाला आभार मानत देवाचे मग मी पुढचा प्रश्न केला 

नाव विचारतात जरा नजरेचा रोखं तिने धरला

पण निर्मळ भाव बघून माझे पुढाकार तिने घेतला 

स्वतःचे नाव सांगून माझ्या नावाचा आग्रह तिने धरला

प्राथमिक ओळख इथे संपली होती 

आणि तितक्यात बस देखील येऊन थांबली होती मग 

चढत बस मध्ये मागे वळून तिने पाहिले "नवीन होती ती तिथे" मग हे अजूनच पक्के झाले 

सोबत बसत तिने माझ्या मग "घर कुठे तुमचे?" विचारले उत्तर मिळता मग "मी नवीन इथे" असे देखील सांगितले

पुढे बोलताना कळले की शेजारीच आहे घर तिचे 

न माहीत का पण मग मन अधिकच सुखावले 

मग दिवसागणिक दिवस गेले 

ओळख अधिक दृढ होत गेली 

आता तिची जागा मैत्रीने घेतली 

पण मनात मात्र एक वेगळीच धाकधूक जाणवू लागली 

मग जरा मोकळेपणा वाढला आणि 

पावसाळ्यात फिरण्याचा छंद दोघांना जडला 

नवनवीन ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याचा 

आणि एकमेकांसोबत नवीन आठवणी बनवण्याचा...

आज देखील तो टपरीवरचा चहा, उगीचच मारलेला तो शहराचा पट्टा, निसर्गाच्या नयनरम्य वातावरणातला फेरा तर धबधब्याच्या पाण्यात केलेल्या खोड्या 

नाही नाही म्हणतात सगळ्या आठवणी ताज्या झाल्या आणि अलगदपणे मनात घर देखील करून गेल्या 

ओठावर हसू आणि डोळ्यात आसू दोन्ही एकाच वेळी आले "ती असती आज सोबत तर झाले असते बरे" असे सुद्धा वाटले

आयुष्यभर तिच्यासाठी जगलो आणि तिच्यासोबत जगलो पण आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर मात्र तिने मला एकटं सोडलं 

अनोळखी पासून मैत्रीण, मैत्रिणीपासून प्रेयसी आणि प्रेयसी पासून बायको ती माझी झाली 

आणि आमची ही गोड प्रेम कहाणी या पावसानेच तर पाहिली 

आजही हा पाऊस तिच्याच आठवणींनी भरलाय 

माझ्याही आयुष्यात आता फक्त हा पाऊसच तर उरलाय


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract