STORYMIRROR

MAHENDRA SONEWANE

Romance

3  

MAHENDRA SONEWANE

Romance

मुक्त आनंद

मुक्त आनंद

1 min
11.3K

अपराधी बनवून तू मला 

कैदेत ठेवले होते, 

मी कधीच नाही म्हटलं 

तुझ्यावर प्रेम केले होते ||


स्वतंत्र होतो मी 

स्वैराचारी मुळीच नाही, 

आता जीवनात माझ्या 

अशक्य काहीच नाही ||


म्हणून मी खुल्या मनाने 

आज सांगतो आहे, 

सोड बंध प्रेमाचे 

जे तू गुंतवले आहे ||


गेले ते गोड दिवस 

विसर आता तू मला, 

आज मी मोकळा अन् 

करतो मोकळा तुला ||


गारठलेल्या मनात माझ्या 

राग तुझे समजले होते, 

तुझ्या अवचित भेटीचे 

ते क्षण मला कळले होते ||


मी एकटाच त्या रात्री 

पश्चातापाने तेवत होतो, 

तुझ्या स्वप्नांचे रंग मी 

माझ्या अश्रूंनी धुवत होतो ||


तुझ्या चुकीने मला तू 

सर्वांपासून दुर केले होते, 

तुझ्या कैदेतून सुटून 

हे भास मिळवले होते ||


तुझ्या बंधनातून आज मी 

मोकळा झालो आहे, 

तोडून तुझा पिंजरा मी 

मोकळा श्वास घेत आहे ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance