मुखवटे
मुखवटे
प्रेम म्हणजे काय असतं
स्वार्थाचा पर्याय असतो.
एकमेकांच्या गरजांसाठी
भावनेचा बाजार भरतो.
मुखवट्याच्या आवरणाखाली
खरा चेहरा लपलेला
भाव कसा कळावा
खोटाच गालावर ओघळलेला.
अभिनयाची कार्यशाळा
रोज चाले घरोघरी.
नवरसांचा मुक्त वापर
ती यशस्वी कलाकारी.
जर्जर झाली कुटुंबसंस्था
नात्यांचे बंध निकामी
संपत्तीची गुलाम नाती
प्रेमाची तिजोरी रिकामी.
जिव्हाळ्याची नाती गोती
व्यवहारा शी बांधील झाली
सरणावरच्या अग्नीची ही
चिरशांती लोप पावली..
