कविता... माझे सुंदर गाव
कविता... माझे सुंदर गाव
उत्तुंग इमारती
बनावटी बंगले
सिमेंटची जंगले
चला तुडवीत वाट
बघू गावाकडचा थाट..
उंच डोंगरमाथा
झाडी घनदाट
चरणारी गुरे ढोरे
अन् पक्षांचा किलबिलाट....
हिरवागार शालू
धरतीमाता ल्याली
काठ जरतारी
निसर्गाने विणली....
हिरव्या मखमली पायघड्या
घातल्या धरतीवर
अनवाणी फिरण्याची
मजाच काही ओर...
ताज्या भाज्या गोड फळे
चाखायच्या रोज
चला जरा बघायला
शेतातली मौज...
साधी माणसे साधी राहणी
जिव्हाळा त्यांचा असली
चार दिवसाच्या मुक्कामात
विसराल शहर नकली...
