STORYMIRROR

SATISH KAMBLE

Inspirational

4  

SATISH KAMBLE

Inspirational

मतदान

मतदान

1 min
355

लोकशाहीतील सर्वोच्च अधिकार

तो म्हणजे मतदान


या देशावर जनतेचे राज्य असल्याचा

पुरावा म्हणजे मतदान


गरीब आणि श्रीमंताला एकाच रांगेत

उभे राहायला लावते हे मतदान


चुकीचं शासन करणार्‍यांना जमीनीवर आणण्यासाठी

महत्त्वाची भूमिका पार पाडते मतदान


लोकांच्या मनातील खदखद व्यक्त करण्याचे

उत्कृष्ट माध्यम म्हणजे मतदान


आपला शासनकर्ता आपणच निवडण्याचा

सन्मान म्हणजे मतदान


लोकशाहीतील अभूतपूर्व सोहळा

म्हणजे मतदान


आणि


या सर्वांचे महत्त्व जाणणारा,

लोकशाहीचा आदर करणारा,

देशाप्रती आपल्या कर्तव्याची जाण असणारा

तोच खरा जागरूक मतदार.....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational