मृत्यूची चाहूल
मृत्यूची चाहूल
मृत्यूची चाहूल पुर्वी लोकांना लागायची
पण आज काल मृत्यू झालाय स्वस्त
कधी कुणाला केव्हा कसा येईल मृत्यू
नाही सांगता येत तरी सर्व आहेत मस्त.
बॉम्बस्फोट किंवा अतिरेकी हल्ले कधी
होऊन आपलं येईल मरण सांगता येईना
कामावर गेलेला माणूस घरी सुखरूप
येई पर्यंत घरातल्या लोकांना धीर राहिना.
जन्म घेतलाय तर मग मरण आहेच
एक दिवस ते येणार त्यात काय मोठसं
मौज मस्ती करा आणि जीवन मस्त जगा
मृत्युच्या भितीने खचून नाही जायचं एवढसं.
वय झालं अन् थोडं आजारपण आलं तर
मृत्युच्या चाहुलीने जीव होतो कावरा बावरा
त्यावेळी घरच्यांचा जीव लागतो टांगणीला
प्रश्न मोठा होतो त्यांना आता कसे बरे सावरा.
पाप पुण्याचा हिशोब करून जीव धस्तावतो
पै पैसा,मित्र शत्रू,नाती गोती,बरे वाईट स्मरते
केला एवढा अट्टाहास आता सगळं सोडायचे
लोण्याहुन मऊ होऊन सर्वांशी घेतो नमते.
माझ्या मरणाने दुःख होईल का घरच्यांना
गुण्या गोविंदाने राहतील का माझ्या नंतर
फोटो टांगून मला स्मरतील का सगळे की,
वागतील नात्या गोत्यामध्ये ठेऊन अंतर.
