मृगाचा पाऊस
मृगाचा पाऊस
सूर्य दिसेनासा झाला
नभ अंधारला भारी |
सर पावसाची आली
आज भरल्या दुपारी ||१||
आला मृगाचा पाऊस
आता अवनी भिजेल |
आनंदाने चोहीकडे
स्रुष्टी नटून सजेल ||२||
थेंब थेंब पावसाने
थंडी भरली अंगात |
आनंदाने भिजलो मी
पहिल्याच पावसात ||३||
पहिल्या पावसाची ही
ओढ प्रत्येकाला राही |
वाट चातका सारखी
शेतकरी सुध्दा पाही ||४||
पशु पक्षी प्राणीमात्र
वाट याची बघतात |
मुले मुली सगळेच
आनंदाने नाचतात ||५||
पावसाळा म्हटला की
येतो डोळ्याच्या समोर |
चहा आणि कांदाभजी
खाती लहान ना थोर ||६||