STORYMIRROR

S. Bhure.

Tragedy Classics Fantasy

2  

S. Bhure.

Tragedy Classics Fantasy

मोगरा आणि विश्र्व

मोगरा आणि विश्र्व

1 min
36


गंधात नाहते मंद वारे, मोगरा बोलतो

सुगंध दरवळता उरात, स्वप्न फुलतो

चंद्राच्या साक्षीला उघडती पाकळ्या

गुपित स्पर्शाचे नभात रंग उमलतो

निवांत क्षणांना सुवासाची साथ येई

मनाच्या पायघड्या हळूच गारवा झुलवतो

फुलावरी कोसळती दवबिंदू श्वासांचे

नकळत आठवांचा किनारा हलवतो

वाऱ्याच्या तालावर झुलते मंद हास्य

प्रत्येक थेंबात भावनेचा सूर सजतो

जग हे क्षणिक, पण गंध अमर राहतो

मोगऱ्यासारखा प्रेम शाश्वत उमलतो


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy