ती
ती
अचानक वळणावळणाच्या नि:शब्द प्रवासामध्ये
कोणी तरी स्मित हास्य करत आलं
काय जादू केली माहित नाही,
पण मन सारखं हसु लागलं..
बोलायला निखळ पाण्यासारखी,
असं वाटतं वाहून जाव तुझ्या बोलण्यात
वागायला अगदी लहान मुली सारखी,
असं वाटतं स्वताला विसराव तुझ्यात..
जनु अंधाराला उजेड मिळाला
असं सारखं वाटतयं,
जस निरंतर शांततेत सुमधुर संगीत
वाजत असं वाटतयं..
तुझ्या निरागस्य हसण्यामध्ये
सार काही विसरूण हसाव वाटतयं,
तू काय केलं माहित नाही,
पन मन तुझ्या विचारामध्ये
स्वच्छंद पक्षा प्रमाणे उडतयं,
तुझी ती हवी हवीशी सोबत
नेहमी साठी हवीशी वाटतय.
असा एकही दिवस नाही
जो मी तुझ्याशी बोलल्या शिवाय राहत नाही,
तुझा बोललेला शब्द हृदयामध्ये
घर केल्या शिवाय जात नाही..
हळवीशी चाहुल लागली
की तुझाचं आभास होतो,
का कळेना नेहमी देवाकडे
मी तुलाच मागतो..
खरच सांगतो आता
तुझी खूप सवय झाली,
तू दूर जाण्याची सततची
भीती लागायला लागली....
